पंचाला लाथ मारुन शिव्या देणं आलं अंगलट, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांचे 3 वर्षांसाठी निलंबन, निर्णयाने कुस्ती क्षेत्रात खळबळ..

अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी काल मोठा गोंधळ झाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीही सुरू झाली. यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं.
तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. यामुळे या स्पर्धेत पंचांला लाथ मारणं आणि त्यांच्याशी हुज्जत घालणं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या दोघांवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही तीन वर्षासाठी निलंबित केलं आहे. परिषदेचा हा निर्णय दोन्ही पैलवानांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे. या निर्णयावर आता शिवराज आणि महेंद्र यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
या स्पर्धेत महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. यामुळे देखील मोठा वाद निर्माण झाला.
त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे याचीच बरीच चर्चा झाली.