Kamal Pardeshi passed away : अंबिका मसाला घराघरात पोहोचवणाऱ्या कमल परदेशी यांचे निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


Kamal Pardeshi passed away : अंबिका मसाले ज्यांनी घराघरात पोहोचवणाऱ्या कमलताई परदेशी यांचे निधन झाले आहे. स्वतः निरक्षर असूनही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला आहे.

अंबिका उद्योग समूहच्या माध्यमातून घरात घरात पोहोचलेल्या कमल परदेशी यांचं निधन झाले आहे. ब्लड कॅन्सर झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कमल परदेशी या काही दिवसांपासून कर्करोगाशी लढा देत होत्या. परंतु मंगळवारी (दि. २) वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे २३ वर्षापूर्वी बचत गटातील महिलांना एकत्रित करत त्यांनी अंबिका मसाले हा ब्रँड तयार केला होता. Kamal Pardeshi passed away

स्वतः निरक्षर असूनही आपल्या मसाल्याचे मार्केटिंग त्यांनी जगभरात केले. आपल्या मसाला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हाताला कामे देत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली होती.

कोरोनातील लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली होती, परंतु त्यानंतर देखील मोठ्या जिद्दीने त्यांनी आपला व्यवसाय वाढवला होता. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना व्यवसाय उभा करण्यास मोलाची मदत केली होती.

नऊवारी साडीतील प्रसिद्ध उद्योजिका म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी उभारलेल्या अंबिका औद्योगिक मसाला केंद्र या ठिकाणी जर्मनीच्या गव्हर्नर यांनी भेट दिली होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!