Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरून शरद पवार गटात मतभेद, रोहित पवार आणि जयंत पाटील यांची वेगळी मतं? जाणून घ्या..


Jayant Patil : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

मात्र अशातच राज्याची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडी विस्कटलेली आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटात मतभेद असल्याचे समोर आले आहे. रोहित पवारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागितला तर जयंत पाटील यांनी हे सरकारचं अपयश असून एका व्यक्तीला दोष देणार नाही म्हणत राजीनाम्याला काही अर्थ नाही असे म्हंटले आहे.

जयंत पाटील म्हणाले, आता दोन महिनेच राहिले आहेत. दोन महिन्यासाठी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे त्याला काही अर्थ वाटत नाही. हे अपयश संपूर्ण सरकारचे आहे. एका व्यक्तिला दोष देणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून सगळे सरकार महाराष्ट्रात अपयशी ठरलेलं आहे. महिलांना, बालकांना ते संरक्षण देऊ शकत नाही. आता पोलिसांवरही हल्ले व्हायला लागलेत. Jayant Patil

त्याचा अर्थ पूर्णपणे महाराष्ट्रात पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार सरकार करत आहे. कुणाची कधी बदली होईल, कोणत्या कारणासाठी होईल, सगळ्याच बदल्या आर्थिक व्यवहाराने झाल्या तर नैतिकता राहिली कुठे हा प्रश्न महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांबद्दल जनतेला पडायला लागला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!