पुण्यातील घटनेने हळहळ! आजारपणामुळे परीक्षा देता आली नाही, तरुणी थेट लोहगडावर गेली अन्…


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका झुडुपात बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकट खळबळ माजली आहे. तिने नैराश्यातून गडावरून उडी घेत आपली जीवन यात्री संपवल्याचं आता समोर आले आहे.

मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१ वर्षे, रा. लातूर) असं तिचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गेल्या वर्षी तिचं अपेन्डीक्सचं ऑपरेशन झालं होतं. आजारपणामुळे एल. एल. बी. मधील तिसऱ्या वर्षाची परीक्षा देखील देता आली नव्हती, यामुळे ती नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आले आहे. १८ मार्च रोजी मानसी ही घरातून कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली होती. मात्र, दिवस मावळला तरी ती घरी आली नाही. काळजी पोटी तिच्या घराच्यांनी तिला फोन केला मात्र तिचा फोन बंद येत होता. त्यानंतर नातेवाईकांनी मानसी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली.

यानंतर तपास सुरु झाला होता. पोलिसांनी तिच्या मैत्रिणींकडे देखील विचारना केली. मात्र, तिच्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी अखेर मोबाईलचे तांत्रिक लोकेशन काढले. त्यावरून तिचे शेवटीचे लोकेशन हे लोहगडावर होते. पोलिसांनी तिथेल सिसिटीव्ही चेक केल्यानंतर ती लोहगडावर दिसून आली.

यामध्ये ती जाताना तर दिसली, मात्र परत येताना काही दिसली नाही. त्यानंतर लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कु टीमने पोलिसांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला.काही तास शोधल्यानंतर मानसीचा मृतदेह लोहगाडाच्या पायाथ्याशी असलेल्या एका झाडीत आढळून आला. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला.

मागील वर्षी तीचे अपेन्डीक्सचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे तिला एल एल बीच्या तिसऱ्या वर्षाची परिक्षा देता आली नव्हती. याच नैराश्यतून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत तपास सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!