पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पडणार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज…

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात काल रविवारी ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झालेली दिसून आली. एकूणच काल पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, पाऊस आला नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये उष्णता वाढली असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
होळीनंतर तापमान वाढते, परंतु यावेळी महिनाभर आधीच तापमान वाढ झाली आहे. अशातच, हवामान खात्याने पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे
.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रात याचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यानंतर उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवर पावसाची शक्यता असली तरी विदर्भात उकाडा कायम आहे. चंद्रपूर आणि वर्धाजिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर रत्नागिरी , सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी उष्मा वाढला आहे. हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला असून, नागरिकांना उष्माघातापासून (बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.