धक्कादायक! शिरूर येथे दारूच्या व्यसनातून पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ, पतीविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका २८ वर्षीय महिलेनं आपल्या पतीविरोधात सातत्याने शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून,पती विरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील बाबूराव नगर येथे हा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अस्मिता सिध्देश कदम (वय. २८ वर्षे,व्यवसाय-गृहिणी,रा. बाबूराव नगर,ता.शिरूर,जि. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून,महिलेचा पती सिध्देश पंढरीनाथ कदम (वय.३७,बाबूराव नगर,ता.शिरूर,जि.पुणे)याच्या विरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अस्मिता कदम व सिद्धेश कदम यांचे लग्न २०१४ मध्ये कुटुंबियांच्या संमतीने शिरूर येथे झाले होते.लग्नानंतर काही दिवस कल्याण व नंतर बेलवंडी फाटा येथे राहिल्यानंतर सध्या दोघे पती पत्नी शिरूर येथील बाबूरावनगरमध्ये तीन वर्षांपासून राहत होते.
मात्र,लग्नानंतर पती सिध्देश याला दारूचे व्यसन असल्याचे उघड झाले.तसेच सिद्धेश योग्य प्रकारे नोकरी करत नव्हता. त्यामुळे कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी वाढत गेल्या. त्यानंतर सिद्धेशचे दारूचे व्यसनही वाढत गेले त्यामुळे दारूच्या नशेत पती सिद्धेश घरामध्ये नैराश्येतून वारंवार भांडण करत होता.तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी अस्मिताकडे तगादा लावत होता.
पैसे न आणल्यास सिद्धेश अस्मिताचा मोठ्या प्रमाणावर शारिरीक व मानसिक छळ करत होता.या त्रासाला कंटाळून अस्मिता माहेरी गेल्यानंतर पती सिद्धेश समजूत काढून अस्मिताला पुन्हा घरी घेऊन येत असे.परंतू, सिद्धेश कडून अस्मिताला सतत त्रास सुरुच राहिल्यामुळे अखेर अस्मिताने शिरूर पोलीस ठाण्यात पती सिद्धेशच्या विरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, विशेष म्हणजे फिर्यादी अस्मिताने पोलिसांना स्पष्ट सांगितले की,तिला कोणत्याही स्वरूपाचे समुपदेशन नको आहे.तसेच संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई व्हावी,अशी मागणी फिर्यादी अस्मिताने पोलिसांकडे केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.