दुचाकी चालवणांसाठी महत्वाची बातमी! भरावा लागणार टोल आणि दोन हजारांचा दंड, जाणून घ्या…

नवी दिल्ली : एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या माहिती दुचाकीस्वारांना मोठा धक्का बसला आहे.आतापर्यंत केवळ चारचाकी किंवा त्याहून मोठ्या वाहनांवर टोल लागायचा, पण आता दुचाकींनाही टोलच्या रांगेत उभं राहावं लागणार आहे.
सरकारचा हा नवा नियम १५ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य वाहनचालकांवर होणार आहे. आजवर जेव्हा दुचाकीवरून आपण टोल प्लाझावरून जातो, तेव्हा थांबावं लागत नाही, कारण टोल भरावा लागत नसे. परंतु आता हे बदलणार आहे.
नव्या नियमानुसार दुचाकी वाहनांनाही FASTag लावणं बंधनकारक असेल आणि त्याद्वारे टोल भरावा लागेल. जर कुणी नियमांचं उल्लंघन केलं, तर त्याला तब्बल २,००० रुपये दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांना यापुढे मोठा त्रास होणार आहे.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात जवळपास १,०५७ टोल नाके कार्यरत आहेत. या टोल नाक्यांमधून लाखोंच्या संख्येने वाहनं दररोज प्रवास करतात. यापैकी आंध्र प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ७८ टोल प्लाझा आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये १२३ टोल आहेत. त्यामुळे या नव्या नियमाचा परिणाम देशभरातील लाखो दुचाकीस्वारांवर होणार आहे.
दरम्यान केंद्र सरकारने आणखी एक नवा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच वार्षिक टोल पास योजनेची घोषणा केली आहे. ही योजना १५ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून, यामध्ये ₹3,000 चा FASTag आधारित पास मिळेल,