चहाप्रेमींसाठी महत्वाची बातमी! चहा किती आणि कधी प्यावा?, जाणून घ्या फायदे आणि तोटे…

पुणे : चहा म्हणजे अनेकांचा आवडीचा विषय. अनेकांसाठी एक कप गरम चहारोज लागतोच. चहामधील कॅफिन आणि निकोटीनमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो, परंतु त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. याबाबत याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. चहा प्यायल्याने आराम मिळतो, कारण त्यात असलेले कॅफिन शरीराला आराम देते.
संध्याकाळी चहा पिणे फायदेशीर ठरते, कारण पोट भरलेले असते.
डॉक्टरांच्या मते, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिणे योग्य नाही. यामुळे शरीरातील ऍसिड वाढते, ज्यामुळे गॅस, पचन आणि ॲनिमियाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
जर सकाळी चहा घेत असाल तर पिण्यापूर्वी पाणी प्यावे, जेणेकरून दुष्परिणाम टाळता येतील. वृद्धांसाठी चहा पिणे हानिकारक नाही, कारण त्यातील निकोटीनचा त्यांच्या शरीरावर फारसा परिणाम होत नाही. मधुमेह असलेले लोकही चहा पिऊ शकतात, पण त्यांनी साखरेऐवजी तुळस वापरावी.
साखर शरीरावर चहापेक्षा जास्त परिणाम करते. साखरेचे प्रमाण कमी केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. संध्याकाळी चहा पिणे फायदेशीर ठरते, कारण पोट भरलेले असते. यामुळे चहा पिणे चुकीचे नाही मात्र त्याची वेळ प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर परिणाम भोगावे लागतात. तसेच चहा देखील योग्य प्रकारे बनवावा.