पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! महापालिकेने नागरिकांना दिला मोठा इशारा…


पुणे : पुणे महापालिकेने नागरिकांना इशारा दिला आहे की, जर घरगुती पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त वापर केला तर संबंधित सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडले जाईल. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने हा कठोर निर्णय घेतला आहे.

पुण्यात बसवलेल्या जलमापक (मीटर) प्रणालीच्या माध्यमातून काही सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचा अहवाल महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे प्रशासनाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. पुणे शहरात लागू असलेल्या समान पाणी योजनेच्या अंतर्गत १४१ झोन तयार करण्यात आले आहेत. या योजनेचा भाग म्हणून, ४७ झोन पूर्ण झाले असून ४१ झोनमध्ये जलमापक प्रणालीद्वारे पाण्याची अचूक मोजणी केली जात आहे. यामध्ये मुख्य जलटाकीतून सोडलेले आणि सोसायटीच्या टाकीत पोहोचलेले पाणी यामधील फरक नोंदवला जातो.

दरम्यान, महापालिकेला प्राप्त झालेल्या अहवालानुसार काही सोसायट्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजेच शेकडो लिटर पाणी अधिक वापरले जात आहे. यामुळे प्रशासनाने हे प्रकार गंभीरतेने घेत, पाणी अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

शहरात प्रत्येक व्यक्तीसाठी दररोज १३५ लिटर पाणी वापरण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र, काही सोसायट्यांमध्ये हा वापर ५०० ते ६०० लिटर इतका अधिक असल्याचे महापालिकेच्या निरीक्षणात आल्याने या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट नळजोडणी तोडण्याची कारवाई होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!