तुम्ही पण ‘मोहब्बत का शरबत’ पित असाल तर सावधान, ‘ही’ चूक जीवावर बेतेल, जाणून घ्या..


पुणे : ‘मोहब्बत का शरबत’ हे पेय तरुणाईमध्ये खूपच प्रसिद्ध असून त्याच्या नावामुळेच अनेक लोक आकर्षित होतात. खरंतर, हे सरबत कलिंगड, दूध आणि साखर यांचं मिश्रण असतं, ज्यामुळे त्याला एक ताजा, गोड आणि चवदार स्वाद मिळतो.

या गोड सरबताचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी कोल्हापुरातील डॉक्टर अविनाश शिंदे यांनी बोलताना माहिती दिली आहे.

कलिंगड हे एक अत्यंत पोषणयुक्त फळ आहे. त्यात पाणी, फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. कलिंगड डोळ्यांचे, हाडांचे आणि हदयाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असतं. विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते, पण कलिंगडाचे सेवन केल्यामुळे शरीरात हायड्रेशन राखले जाते.

याशिवाय, कलिंगडामध्ये लाइकोपीन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडन्ट असतं, ज्यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कलिंगडाचा स्वाद गोड असतो आणि त्यातील फायबर्स पचनाच्या कार्यासाठी चांगले असतात. यामुळे, कलिंगडाचं सरबत शरीराला ऊर्जा देतं आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतं. या सर्व फायद्यांमुळे कलिंगडापासून बनवलेलं सबरत आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते.

‘मोहब्बत का शरबत’ किंवा अन्य कोणत्याही सरबतात दूध आणि कलिंगड यांचं एकत्र सेवन करणं पचनासाठी हानिकारक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार, दूध आणि कलिंगड यांचे मिश्रण विषारी ठरू शकतं, कारण हे एकत्र घेतल्यावर पचनशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो.

कलिंगड हे एक रसाळ फळ आहे, ज्यात पाणी आणि इतर पोषक तत्त्वं भरपूर असतात. दुसरीकडे, दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. यामध्ये फॅट्स देखील असतात. हे दोन घटक एकत्र घेतल्यावर पचनशक्तीवर प्रभाव पडतो आणि पाचन क्रिया मंदावू शकते.

कलिंगड आणि दूध एकत्र सेवन करणे टाळावे, कारण त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. केवळ आतड्यांना त्रास होतो असं नाही, तर दीर्घकाळ पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ‘मोहब्बत का शरबत’ सारख्या सरबतांमध्ये दूध आणि कलिंगडाचं मिश्रण टाळण्याचं सल्ला दिला जातो.

‘मोहब्बत का शरबत’ हे गोड सरबत आहे आणि त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. साखरेचं जास्त सेवन हे वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरू शकतं. साखरेचा अधिक वापर केल्यास शरीरातील ग्लूकोज लेव्हल वाढते आणि ते थोड्या वेळाने इन्सुलिनच्या उत्पत्तीवर प्रभाव टाकू शकते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!