संतोष देशमुख आडवा येत असेल तर त्याला धडा शिकवा! वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला काय म्हणाला? सगळंच संभाषण आलं बाहेर….

बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे आता समोर आले आहे.
या प्रकरणात अवादा कंपनीच्या खंडणी संदर्भाने सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड या दोघांमधील संभाषण देखील पोलिसांनी समोर आणले आहे. ७ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडला फोन केला होता.
त्यामध्ये वाल्मीक कराड हा सुदर्शन घुले याला म्हणतो की, उद्या जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे संतोष देशमुख अडवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा…!
अवादा कंपनीकडे खंडणी मागू नका. कंपनीच्या लोकांना काम करू द्या. माझ्या गावातील लोकांना त्यामुळे काम मिळत आहे असे संतोष देशमुख यांचे म्हणणे होते. मात्र संतोष देशमुख आडवे येत असल्याचे सुदर्शन घुले यांनी वाल्मीक कराडला या कॉल वरून सांगितले होते. गावातील लोकांना रोजगार मेळावा म्हणून खंडणी घेऊ नये असे सांगणाऱ्या संतोष देशमुख यांना त्यामुळेच टार्गेट करण्यात आले.