रोजच पोटात दुखायचं, अखेर आजीला सांगितलं, नातीसोबत घडलं भयंकर, दवाखान्यात गेल्यावर…

मुंबई : मुंबईत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत असून दक्षिण मुंबईत एक भयानक प्रकार समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे. तेथे एका २० वर्षांच्या गतीमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झाले.

तसेच १७ जणांनी तिच्यावर अत्याचर केला आणु त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. ५ महिने उलटून गेल्यानंतर ही भयानक घटना उघडकीस आली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीं विरोधात न्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. तर १७ जणांचे रक्ताचे नमुने डीएनए चाचणी साठी घेण्यात आले आहेत, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसीर, पीडित मुलगी गतीमंद असून ती २० वर्षांची आहे. ती वडिलांसोबत दक्षिण मुंबईत राहते. तिला ऐकू येत नाही, नीट बोलताही येत नाही. काही दिवसांपासू त्या मुलीच्या पोटात सतत दुखत होतं, त्याबद्दल तिने जवळच राहणाऱ्या आजीला सांगितलं.
त्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेव्हा धक्कादायकम बाब समोर आली. पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले, तेव्हा रुग्णालयाने याबद्दल पोलिसांना कळवलं.
हे प्रकरण समजल्यावर पोलिसांनी तेथे जात, पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी त्या पीडित मुलीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वयंसेवी संस्थेची देखील मदत घेण्यात आली. संस्थेच्या समुपदेशकांनी चित्र आणि बोटांवर बसविण्यात येणाऱ्या बाहुल्यांच्या आधारे मानसोपचारपध्दतीने मुलीला बोलतं केलं.
दरम्यान, ५ दिवस समुदपदेशक तिच्याशी संवाद साधत होते, अखेर तिने दोघांची नावे वारंवार घेतली. आणि भयानक सत्य उघड झालं. ती मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून काही नरधामांनी तिच्यावर लैंगिक अत्याचर केला.
