नवरा म्हणाला शारिरीक संबंध अन् बायकोनं लग्नाच्या 15 दिवसांनंतर पतीला संपवलं, भयंकर घटनेने राज्यात खळबळ…

सांगली : इंदौरच्या राजा रघुवंशीच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रियकराच्या मदतीने पत्नी सोनम रघुवंशीने राजाला संपवलं. ही घटना ताजी असतानाचा सांगलीच्या कुपवाड येथेही अशीच एक घटना घडली आहे.

२७ वर्षीय महिलेने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांनंतर आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निल तानाजी लोखंडे (वय.५०) असे मृत पतीचे नाव आहे. कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल लोखंडेनं पहिल्या पत्नीचं कर्करोगानं निधन झाल्यानं आपल्याला आयुष्यभर साथ देणारी बायको हवी म्हणून लग्न केलं. मात्र हे लग्न त्याच्या जीवावर बेतेल असा स्वप्नातही त्याने विचार केला नाही.

लग्नानंतर हनीमून करण्याचा उत्साह चाळवला, आणि पती अनिल लोखंडेनं पत्नीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. तेव्हा पत्नी राधिकाने त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी आरोपी राधिका लोखंडेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर शारीरिक संबंधांवरून लोखंडे आणि त्यांची पत्नी राधिका यांच्यात जोरदार वाद झाला होता. यावरून संतप्त होऊन राधिकाने तिचा पती झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. अशी माहिती कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. हल्ल्यानंतर तात्काळ महिलेला अटक करण्यात आली आहे.