श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात! सलग तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या…


नांदेड : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा नांदेड जिल्ह्यात अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नांदेड दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात असताना समोरून आलेल्या एका वाहनामुळे ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या वाहनांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागातील काही कर्मचारी प्रवास करत होते. मात्र, अपघाताची तीव्रता कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नांदेड दौऱ्यात श्रीकांत शिंदे यांनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत पक्ष संघटन, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील विस्तार आणि जनसंपर्क मोहिमांबाबत कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!