Hero MotoCorp : गणेश चतुर्थीला लाँच होणार हिरोची ‘ही’ नवीन स्कूटर, नवीन डिझाइनसह असणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या..


Hero MotoCorp : सणासुदीच्या कालावधीमध्ये स्कूटर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हिरो मोटो कोर्पची स्कूटर विकत घेऊ शकता. कारण हिरो मोटोकॉर्प लवकर नवीन स्कूटर लॉन्च करणार असून ती बहुदा अपडेटेड डेस्टिनी १२५ असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हिरो मोटोकोर्प डेस्टिनी १२५ स्कूटर गणेश चतुर्थीला म्हणजे सात सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करणार अशी माहिती समोर आली आहे व इतकेच नाही तर कंपनीच्या माध्यमातून या स्कूटरचा अधिकृत टीझर रिलीज करण्यात आलेला आहे.

या टीझर नुसार बघितले तर या स्कूटरला समोरच्या एप्रनमध्ये नवीन लाइटिंगचा सेटअप देण्यात आलेला असून फ्रंटफेंडर, हेडलाईट तसेच काऊल, रियर व्ह्यू मिररमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. तसेच या नवीन अपडेटेड डेस्टिनीमध्ये नवीन ड्युअल टोन, पर्ल ब्लॅक कलरचे पर्याय असणार आहेत. Hero MotoCorp

इतकेच नाहीतर हेड लॅम्प क्लस्टरला नवीन एच आकाराचे एलईडी डीआरएल देण्यात आलेले आहेत. टीझर मध्ये दिल्यानुसार बघितले तर या डेस्टिनी १२५ मध्ये बाय ब्रे कॅलिपर्स, रियर डिस्क ब्रेक हे नवीन बदल देखील असण्याची शक्यता आहे.

हे जबरदस्त फीचर्स असणार..

तसेच काही लीक झालेल्या फोटो नुसार बघितले तर डेस्टिनी १२५ पूर्णपणे नवीन बॉडी पॅनल, नवीन आलोय व्हिल्स, ऑल ब्लॅक फ्रंट फॉर्क्स, एक्झॉस्ट कव्हर प्लेट आणि ड्युअल टोन साईड मिरर सह असणार आहे. इतकेच नाहीतर सिटच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आले असून मागे एलईडी टेल लॅम्प असणार आहे.

म्हणजे ही स्कूटर पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असणार आहे. तसेच या स्कूटरला टेक्स्ट, कॉल आणि अलर्ट सह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच या स्कूटरला हिरो स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून टर्न बाय टर्न नेवीगेशन करण्यास मदत करेल.तसेच इंजिन बघितले तर ते 124.6cc असण्याची शक्यता असून ज्याचे आउटपुट 9 बीएचपी आणि टॉर्क 10.4nm असण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!