तो बुडत होता, पण मित्रांना वाटलं रील काढण्यासाठी अँक्टिंग करतोय!! मित्रांच्या समोरच युवकाचा मृत्यू…


भंडारा : भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात एक 17 वर्षाचा तरुण खड्ड्यात पडला आणि त्यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे.

तीर्थराज बारसागडे असं मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चुल्हाड शेतशिवारात रविवारी सायंकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तीर्थराज याला शेतशिवारात असलेल्या एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्याची रील बनवायची होती. हे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी त्यानं स्वतःचा मोबाईल मित्रांना दिला आणि तो खड्ड्याच्या दुसऱ्या भागात उभा राहिला होता.

मात्र, ज्या खोल खड्ड्यात तीर्थराजने पोहण्यासाठी सूर मारला, त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं खोल पाण्यात तो गटांगड्या खाऊ लागला. आपण बुडतोय असं तो जिवाच्या आकांताने ओरडत होता, हात पाय हालवत होता. पण हा रीलचा भाग असावा असा समज त्याच्या मित्रांचा झाला आणि ते चित्रिकरण करतच राहिले. त्यामुळे कोणतीही मदत न मिळाल्याने तीर्थराज पाण्यात बुडाला.

दरम्यान, हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी तीर्थराजचा मृत्यू हा रील बनवताना खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास अड्याळ पोलिस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!