पुण्यात अंध विद्यार्थ्यांच्या हातांच्या ठश्यांनी साकारला तिरंगा, अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने सगळेच भारावले..

पुणे : देशभरात आज 76 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच आज स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील अंध मुलांच्या शाळेत हाताच्या पंजाचे ठसे उमटवत तिरंगा साकारण्यात आला.
कलाविष्कार ड्रॉइंग क्लासेस सहकार नगर पुणेतर्फे क्लासच्या संचालिका गिरिजा कोंडे देशमुख यांच्या संकल्पनेतून हा तिरंगा साकारण्यात आला आहे.
भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने यामधे 150 अंध मुलांकडून 30 फुटी भारताचा तिरंगा त्यांच्या हाताचे ठसे उमटवून तयार करण्यात आला.
त्यामधे त्यांचे सर्व विद्यार्थी पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता.यातून भारत मातेला एक वेगळ्या प्रकारे सलामी देण्याचा प्रयत्न क्लास च्या संचालिका गिरिजा कोंडे यांनी केलेला आहे. त्यामधे त्यांचे सर्व विद्यार्थी पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता.
दरम्यान, यानंतर तोच झेंडा तळजाई येथील क्रिकेट च्या मैदानावर मांडून कलाविष्कार ड्रॉइंग क्लासेसच्या संचालिका गिरिजा कोंडे देशमुख आणि सर्व विद्यार्थी पालक यांच्यातर्फे सलामी देण्यात आली.