गोविंदावर दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अभिनेत्याला अश्रू अनावर…

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात होते. अशातच गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोविंदाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. गोविंदा दु:खात असून त्याला अश्रू अनावर झालेत.
अभिनेता गोविंदाचा दीर्घकाळचा सेक्रेटरी शशी प्रभू यांचे ६ मार्च २०२५ रोजी निधन झाले. या बातमीने गोविंदा यांना मोठा धक्का बसला आहे. शशी प्रभू यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. शशी प्रभू यांच्या निधानाची बातमी कळताच गोविंदा त्यांच्या घरी पोहोचले. आणि प्रभू यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
प्रभू केवळ गोविंदाचे सेक्रेटरीच नव्हते तर जिगरी दोस्तही होते. शशि यांच्या घरी गोविंदा गेल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गोविंदा रडताना दिसत आहे. डोळे पुसताना दिसत आहे. शशी प्रभू यांनी गोविंदाला १९८६ पासून साथ दिली होती. त्यावेळी गोविंदाचा इल्जाम हा सिनेमा रिलीज झाला होता.
शशी प्रभू हे गोविंदाच्या कुटुंबाचा एक भाग होते. त्यांचे गोविंदाच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. गुरुवार 6 मार्च रोजी संध्याकाळी शशी प्रभू यांचं निधन झाले. ही बातमी कळताच गोविंदाने बोरिवली येथील प्रभू यांच्या घरी भेट दिली. प्रभू यांच्या अंतिम संस्काराला अनेक बडे स्टार येणार असल्याचं सांगितले जाते. .
गोविंदाचा दुसरा सेक्रेटरी शशी सिन्हा यांनी शशी प्रभू यांच्या निधानाचे वृत्त दिले आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे शशी प्रभू यांचं निधन झाल्याचं शशी सिन्हा यांनी सांगितलं. चार दिवसांपूर्वीच त्यांची सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं.
पण ते सकाळी अचानक बाथरूममध्ये पडले. जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना कळलं तेव्हा ते त्यांना उचलण्यासाठी धावले. पण प्रभू यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.