Govinda : अभिनेता गोविंदा अडकला! तब्बल १००० कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात होणार चौकशी..


Govinda भुवनेश्वर : ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता गोविंदाची (Govinda) चौकशी होणार असल्याची माहिती आहे. एक हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे.

क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. कंपनीने दोन लाख लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. (Govinda)

गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओमध्ये या कंपनीचं समर्थन केल्याचा आरोप आहे. सोलर टेक्नो अलायन्स अनेक देशांमध्ये ऑनलाइन उपलब्ध असून क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाइन पॉन्झी योजना चालवत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या ऑनलाइन पॉन्झी योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृततेशिवाय देशातील दोन लाखांहून अधिक लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले, असंही ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितले आहे.

दरम्यान, या कंपनीच्या विविध प्रमोशनल व्हिडीओंमध्ये अभिनेता गोविंदाने त्यांची प्रसिद्धी केली होती. म्हणूनच या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी गोविंदाची चौकशी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!