गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली!! आता धक्कादायक कागदपत्रेच आली समोर..

औंध : भाजपचे आक्रमक आमदार म्हणून ओळख असलेले गोपीचंद पडळकर यांनी 34 एकर जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून यामुळे चर्चा सुरु झाली आहे. औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे.
तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे. चंद्रकांत पाटील, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे.
दरम्यान, खाडे यांनी औंध संस्थानमधील या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे देखील माध्यमांना दाखवली आहे. त्यामुळे, आता याप्रकरणी गोपीचंद पडळकरांची भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे प्रकरण जुने असून रीतसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झाला आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.
याबाबत संबंधित माजी मंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खाडे यांनी केली आहे. हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या प्रकरणात मदत करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. यामुळे विरोधक आता याबाबत आवाज उठवत आहेत. गोपीचंद पडळकर नेहेमी विरोधकांची कोंडी करतात. अनेकदा ते अनेक नेत्यांवर आरोप करताना बघायला मिळतात. आता मात्र त्यांच्याच अडचणीत वाढ झाली आहे.