सोन्याने तोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड, किमतीने रचला इतिहास, वाचा नवीन दर…

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. सध्याचा भाव पाहून तर नोकरदारांना सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आपली संपत्तीचं विकावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे आता सोन्याच्या दराने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून सराफा बाजारात सोन्याचा भाव २००० रुपयांनी वाढून ९४,१५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. यामुळे एक वेगळंच रेकॉर्ड निर्माण झाले आहे. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा भाव सतत हाताबाहेर जात असताना शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीच्या काळात मौल्यवान सोन्यात गुंतवणुकीचा ट्रेंड वाढत आहे.
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २००० रुपयांनी वाढले आणि प्रति १० ग्रॅम ९४,१५० रुपयांची नव्या उच्चांकावर झेप घेतली. सोन्याच्या किमतीत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ ठरली. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,१५० रुपयांवर बंद झाला होता. ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा भावही २००० रुपयांनी वाढून ९३,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जी सोन्याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.
१० फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २,४०० रुपयांनी वाढला होता. त्याचवेळी, यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमत १४,७६० रुपये किंवा १८.६% वाढली असून १ जानेवारी रोजी सोन्याचा भाव ७९,३९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. यामुळे सोन्याचे दर लवकरच लाखाचा टप्पा पार करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
असे असताना चांदीच्या किमती घसरल्या आहेत. चांदीचा भाव ५०० रुपयांनी घसरून १,०२,५०० रुपये प्रति किलो झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती वाढताना स्पॉट गोल्डने प्रति औंस $३,१४९.०३ या नवीन उच्चांकावर पोहोचला.यामुळे आता लग्नसराईत हे दर असेल वाढणार की कमी होणार हे लवकरच समजेल.