गणपती बाप्पा मोरया!! गणेश चतुर्थी यंदा १९ सप्टेंबरलाच, जाणून घ्या शुभ मुहूर्त…

पुणे : पावसाळा सुरू झाला की, बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागतात. बहुतांशवेळा पावसाळ्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभीच बाप्पाचे आगमन होत असते. यंदा मात्र गणरायाचे आगमन है, सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच पावसाळ्याच्या अगदी शेवटी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अधिकमास असल्यामुळे बाप्पाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे.
बुधवार २० सप्टेंबर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन.
गुरुवार २१ सप्टेंबर दुपारी 3-34 वाजेपर्यंत गणेशमाता ज्येष्ठा गौरींचे आगमन.
शुक्रवार २२ सप्टेंबर ज्येष्ठा गौरींचे पूजन.
शनिवार २३ सप्टेंबर दुपारी 2-55 वाजेपर्यंत गणेशमूर्ती व ज्येष्ठा गौरींचे विसर्जन. दुपारी 2-55 पर्यंत उत्तरपूजा करून मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वहाव्यात नंतर केव्हाही विसर्जन करावे. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनही करावे.
गुरुवार २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन.
भक्तांना तब्बल १९ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा १९ ला गणेश चतुर्थी आली आहे तर पाचव्या दिवशी म्हणजे २३ ला गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे तर दहा दिवसांच्या बाप्पांना २८ सप्टेंबरला निरोप दिला जाणार आहे.
दरम्यान,१९ वर्षांनंतर आलेल्या अधिक मासामुळे यंदा गणपती बाप्पाचे आगमन गतवर्षीपेक्षा १९ दिवसांनी लांबणार आहे. गेल्यावर्षी ३१ ऑगस्टला गणेशाचे आगमन झाले होते. यंदा १९ सप्टेंबरला गणेशाचे आगमन होणार आहे.