Pune News : गे डेटिंग ॲपवरून मित्रांनीच केला भयंकर प्रकार, नको त्या अवस्थेत काढला व्हिडिओ, नंतर घडलं धक्कादायक कांड…

पुणे : एका तरुणाचा त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी घात केला आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. आरोपींनी पीडित तरुणाला एका गे ॲपवरून संपर्क साधत तरुणाला भेटायला बोलावलं. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला ब्लॅकमेल करत अमानुष छळ केला.
आरोपींचा छळ असह्य झाल्याने तरुणाने थेट आत्महत्या केली आहे. त्याने मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारून जीव दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, २१ वर्षीय पीडित विद्यार्थी पिंपरी शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ५ ते ६ मित्रांनी एका गे ॲपवर बनावट अकाऊंट तयार करून तरुणाशी संपर्क साधला.
काही दिवस या ॲपपवर गप्पा मारल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला एका रूमवर बोलावून घेतलं. पीडित तरुण याठिकाणी भेटायला गेला असता आरोपींनी एका अन्य व्यक्तीसोबत नको त्या अवस्थेत फोटो आणि व्हिडीओ शूट केले.
यानंतर सर्व आरोपींनी मिळून त्या मित्राला त्रास द्यायला सुरवात केली. आरोपींनी पीडित तरुणाकडे ह५०जार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने बदनामी होईल, यामुळे पीडित विद्यार्थी घाबरला. त्याने पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम मेट्रो स्टेशन वरील पुलावरून झाली उडी मारून आत्महत्या केली.
तसेच घटनेत मरण पावलेल्या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाकडे ५० हजारांची मागणी केली होती. तो हे पैसे कुणाला देणार होता, याचा शोध घेत असताना हा गुन्हा उघडकीस आला
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अशाच प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना देखील ब्लॅकमेल केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्या दिशेने पोलीस पुढील तपास देखील करत असल्याची माहिती आहे.