इंदापूरमध्ये कोकळी गुरुकुल शिक्षण संस्थेच्या संस्थापकांचे खंडणीसाठी अपहरण, आरोपी काही तासाच अटकेत….

इंदापूर : येथील गोखळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ यांना अपहरण करून दर महिन्याला एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्या तिघा जणांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. लक्ष्मण साहेबराव हरणावळ हे गुरुकुल गोखळी शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत.
फिर्यादी हे केस कापण्यासाठी जात असताना आरोपींनी हरणावळ यांना अडवून तुम्ही महिन्याला एक लाख रूपये द्या, नाहीतर मी माझे पध्दतीने तुमचेकडे बघुन घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर तंरगवाडी येथील गणेश क्षीरसागर याचे कटींगचे दुकानात फिर्यादी हे कंटीग करीत होते.
आरोपींनी फिर्यादीस मारहान केली. नंतर जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवुन दीड किलोमीटर अंतरावर एका खडी क्रेशरवर घेऊन जाऊन फिर्यादीचे पॅन्टच्या खिशातील पाच हजार रुपये काढुन घेतले. पैसे देण्यास जमेल की नाही अशी धमकी दिली.
याबाबत शिवम बाळू डोंबाळे, वैभव हरिभाऊ माळवे, संकेत आप्पा जळक (सर्व रा. तरंगवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मण हरणावळ यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांकडून काही तासातच सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस हवालदार राजेंद्र काळे, गणेश डेरे, योगेश कर्चे तपास करत आहेत.