पुण्यात विद्युत धक्क्याने माजी सरपंचासह सख्या भावाचा मृत्यू, रात्री उशिरा सापडली डेडबॉडी.


पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजगड तालुक्यात शेतीच्या कामासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असल्याची हृदय द्रावक घटना समोर आली आहे.विजेचा शॉक बसून या दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दामाजी भाऊराव गायकवाड आणि दत्तात्रय भाऊराव गायकवाड असे मृत झालेल्याची नावे आहेत. हे दोन्ही भाऊ गुंजवणी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात शेतीसाठी पाण्याची विद्युत मोटार बसवण्याचे काम करत होते. मात्र दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना अचानक यंत्रणेत विद्युत प्रवाह उतरला आणि दोघांनाही जोरदार शॉक लागला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दामाजी गायकवाड हे निव्ही-घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून कार्यरत होते, त्यामुळे परिसरात त्यांचे मोठे नाव होतं पण विजेचा शॉक लागून मृत्यूने घात केला आहे. शॉक बसल्यामुळे दोन्ही भावांचा तोल गेला आणि ते धरणाच्या खोल पाण्यात पडले. ही घटना लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले होते.

या घटनेची भीषणता पाहून स्थानिक प्रशासनाने बचाव पथकाच्या मदतीने शोधकार्य हाती घेतले. ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणेने अनेक तास अथक प्रयत्न केल्यानंतर रात्री उशिरा या दोन्ही भावांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!