चौफुल्यात न्यू अंबिका कला केंद्रात टाळ व चाळांचा अनोखा संगम ! वारकऱ्यांसाठी लोककलांवतांनी लोककलेचे सादरीकरण करुन अन्नदानाचा लाभ देत केले मंत्रमुग्ध…

केडगाव : आषाढी वारीकरीता पंढरीसाठी निघालेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना विश्रांती मिळून लोककलेतून मनोरंजन मिळावे म्हणून न्यू अंबिका केंद्र , वाखारी (चौफुला ) यांच्याकडून वारकऱ्यांसाठी लोककलेच सादरी करण लोककलावंतांनी मनमुरादपणे केले. वारीतील टाळांचा व लोककलेतील चाळांचा अनोखा संगम लोक कलावंतांनी करीत वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्काम आटोपून पुढील वरवंड मुक्कामाकडे मार्गस्थ होत असताना वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने वारकऱ्यांसाठी लावणी आणि अभंगांच्या जुगलबंदीचा भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रात न्यू अंबिका कला केंद्र हे प्रसिद्ध केंद्र असून या कला केंद्रांत रसिक येत असतात. मात्र या कला केंद्राचे मालक डॉ. अशोक जाधव व जयश्री जाधव हे दरवर्षी आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचा विरंगुळा व थकवा दूर करुन मनोरंजन करुन अन्नदानाची सेवा करत असल्याची परंपरा जपली आहे.
या कार्यक्रमातून भक्ती आणि लोककलेचा संगम घडून वारकरी पंढरीचा मार्ग धरीत असतात. यंदाच्या सोहळ्यात वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वारकऱ्यांची मनोरंजन व अन्नदानाची व्यवस्था केली होती. लोककलावंतांनी वारकऱ्यांना अन्नदान स्वतः च्या हस्ते वाढवून त्यांची मनोभावे सेवा केली.
