शिक्रापुरात जमिनीच्या वादातून माजी उपसरपंचाचा खून ! आरोपी घराजवळ हल्ला चढवू़न फरार ..!!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका माजी उपसरपंचांवर प्राणघातक हल्ला झाल असून मानेवर वार झाल्याने माजी उपसरपंचाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दत्तात्रय गिलबिले असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. त्यांच्या घराजवळच एका अंदाजे ३५ वर्षाच्या इसमाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक व धक्कादायक घटना घडली असून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात नेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून सदर घटनेने शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती मिळताच तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी तातडीने पोलीस बंदोबस्त पाठवत, परिस्थिती नियंत्रणात आणली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
Views:
[jp_post_view]