बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षांपासून सुरू होतं विकृत कृत्य, मुलगी गरोदर राहिली, अन्…

बुलढाणा : एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं वारंवार पीडित मुलीच्या शरीराचे लचके तोडले आहेत. मागील दीड वर्षांपासून बापच मुलीचं लैंगिक शोषण करत होता. ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत तपास सुरु आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उघड होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दीड वर्षांपूर्वी जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पीडित मुलीवर अत्याचार कुणी केला? याची काहीच उघड होत नव्हती. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली. अल्पवयीन मुलीला 28 आठवड्यांची गर्भवती करणारा पीडितेचा सख्खा बापाच निघाला आहे. यामुळे सगळेच हादरले. आरोपी मागील अनेक महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचं डीएनए रिपोर्टमध्ये दिसून आले आहे.
यामुळे मुलीच्या पोटात वाढणारं बाळ आरोपी बापाचेच असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी जलंब पोलीस तातडीची पावलं उचलत नराधम आरोपी बापाला अटक केली आहे. त्या धक्कादायक प्रकाराने समाजमन सुन्न झालं आहे. यामुळे बापावर कडक कारवाई करून त्याला शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा अधिक तबास जलंब पोलीस करत आहेत.