फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! आता 7.5 HP पंपावर मिळणार 50% अनुदान, असा करा अर्ज…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केला आहे. यामध्ये सौर कृषी पंप योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी योजना ठरत असून, योजनेत 7.5 एचपीपर्यंतच अनुदान दिले जाणार असून, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी शेतकऱ्यांना स्वतःचा खर्च करावा लागेल.
तसेच यामध्ये या योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले असून, पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये 10 एचपी क्षमतेचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंचनाच्या गरजा भागवण्यासाठी सौरऊर्जेचा प्रभावी वापर करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा पुरवठा मिळतो आणि विजेवरील अवलंबित्व कमी होते.
राज्य सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप मिळत आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ‘SOLAR MTSKPY’ पोर्टलवर अर्ज भरून सौर पंपासाठी नोंदणी करता येते. यामुळे ही एक महत्वाची योजना आहे.
दरम्यान, विजेच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार सहन करावा लागत होता, परंतु या योजनेमुळे विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेती उत्पादन वाढण्यास मदत होईल. यामुळे योजनेचे अनेक फायदे आहेत.
केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात टिकाऊ आणि किफायतशीर सिंचनाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, पत्ता, शेतीची माहिती आणि बँक तपशील भरणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर पोहोच पावती मिळेल, आणि पुढील प्रक्रिया महावितरणच्या स्थानिक उपविभागीय कार्यालयाद्वारे पार पडेल.
तसेच शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक पाणी स्रोत असणे आवश्यक आहे, जसे की शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नदीच्या जवळील शेती. संबंधित क्षेत्रात पाण्याची उपलब्धता महावितरणद्वारे पडताळून पाहिली जाईल आणि त्यानंतर अर्जदाराची पात्रता निश्चित केली जाईल, असेही सांगितले गेले आहे.