सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी घडामोडींना वेग, सरकारचा मोठा निर्णय…

मुंबई : सध्या मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने मराठा उपसमितीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत, पूर्वी चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते, आता राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत.
यामुळे हालचालींना वेग आला आहे.
सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे. पूर्वी अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे आता या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. या समितीमध्ये एकूण 12 सदसस्य आहेत. याबाबत आता येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

गेल्या आंदोलनापेक्षा पाच पट मोठं असेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक गावांना भेटी देखील दिल्या आहेत. आता राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत.

तसेच चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे, भोसले, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे सर्व मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे.