8 वा वेतन आयोग आल्यानंतर कर्मचाऱ्यांची दिवाळी! हवालदाराला मिळणार 62 हजार पगार, जाणून घ्या लिपिक आणि शिपायाला किती मिळणार पगार…

मुंबई : मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली असली तरी देखील अजून याची समिती काही स्थापित झालेली नाही. पण, लवकरच या समितीची स्थापना होणार आहे. ही समिती आठवा वेतन आयोगासाठी शिफारशी निश्चित करून या शिफारशी सरकारला सुपूर्द करणार आहे. यामुळे याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारने 17 जानेवारी 2025, याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला. या दिवशी केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे.
सध्या शिपाई, लिपिक, हवालदार आणि करोडो कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आपला पगार किती असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाली होती.
दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सर्वात खालच्या स्तरावरील म्हणजे लेव्हल-1 कर्मचारी, जसे की शिपाई आणि अटेंडंट यांचा पगार 18,000 वरून 51,480 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) चे वेतन 19,900 रुपयांवरून 56,914 रुपयांपर्यंत वाढू शकते, अशी माहिती आहे.
दरम्यान, कॉन्स्टेबल आणि कुशल कर्मचाऱ्यांचा पगार देखील 62,062 रुपयांपर्यंत वाढू शकतो, जो सध्या 21,700 रुपये आहे. स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिक यांचा सध्याचा पगार 25,500 रुपयांवरून 72,930 रुपयांपर्यंत वाढू शकतो, यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळीच होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण जर फिटमेंट फॅक्टर 2.86 राहिला तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत कर्मचारी प्रतीक्षा करत आहेत.