धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ! ड्रग्स प्रकरणातील आरोपींसोबत भरसभेत मुंडे यांचा फोटो दाखवत सुरेश धस यांनी उडवली खळबळ, फोटोत नेमकं कोण?

मुंबई : केज तालुक्यामधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण आक्रमकपणे लावून धरलं आहे.
अशातच आता सुरेश धस यांनी मोठा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुजरातमध्ये जे ड्रग्स पकडण्यात आलं. त्यातील आरोपी महाराष्ट्रातील होते. त्या आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत, असं गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भरसभेत या मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटो दाखवला.
तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवून आमदार मनोज कायंदे यांना मंत्री करण्याची जोरदार मागणीही केली. धाराशिव येथील सभेत सुरेश धस बोलत होते. सुरेश धस यांनी भरसभेत एका वृत्तपत्राची बातमी वाचून दाखवली.
ड्रग्स तस्करीची ही बातमी होती. या प्रकऱणात अडकलेल्या आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचा फोटो असल्याचं सांगत धस यांनी भरसभेत हा फोटोही दाखवला. पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये ६० कोटींचं १७६ किलो ड्रग्स पकडलं. ८ महिन्यापूर्वीची बातमी आहे. महाराष्ट्रातील तीन जणांसह पाच जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसात 890 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. पेपरातील बातमी आहे.
दरम्यान, ड्रग्स म्हणजे इंजेक्शन. ८९० कोटीच्या ड्रग्सप्रकरणात कैलास सानप आणि दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटकेत आहेत. गेल्या एक का दीड वर्षापासून हे आरोपी अटकेत आहेत. त्यांचा कुणाबरोबर फोटो? त्यांचा धनंजय मुंडेसोबत फोटो. आका. मेन आका. हा फोटो व्हाटसअपवर टाकतो. करा खुलासे आणि द्या आम्हाला शिव्या, असं सुरेश धस म्हणाले.