Dhananjay Munde : बीडच्या घटनेतील आरोपांवर धनंजय मुंडेंचं वक्तव्य, म्हणाले, मला समाजकारण आणि राजकारणातून..


Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने जिल्हाच नव्हे तर सगळं राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड अटकेत नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणावरून विविध नेत्यांनी लक्ष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत विरोधकांवर पलटवार केला आहे.

माझ्यावर विविध आरोप करून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा काही लोकांचा उद्देश आहे, असा हल्लाबोल मुंडे यांनी केला आहे. बीड हत्याकांडावर आपली भूमिका स्पष्ट करताना धनंजय मुंडे म्हणाले की, संतोष देशमुख यांची ज्यांनी कोणी निर्घृण हत्या केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरोपी फासावर गेले पाहिजेत. कारण तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता.

त्यांच्याबद्दल मलाही आदर होता. जे कोणी आरोपी असतील, ते कोणाच्याही जवळचे असतील, अगदी माझ्याही जवळचे असतील तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त राजकारणापोटी माझ्यावर होत असलेले आरोपांमागील राजकारण आपण समजू शकता, असा टोला मुंडे यांनी लगावला आहे. Dhananjay Munde

धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर दोन कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचीही पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे.

वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते, ते माझ्या जवळचे तर आहेतच. त्यामुळे शासन कोणालाही पाठीशी घालत नाही. पण एखाद्याला सकाळी-सकाळी माझ्याविरोधात बोलल्याशिवाय त्यांची सकाळच होत नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!