क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, मराठा समाजाचा नुसता वापर केला, देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला पत्रकार प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे.

यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे. त्यामुळे तो सापडणार नाही. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केला, असे त्यांनी म्हटले आहे.

तुम्हाला जर खरंच छत्रपतींचे प्रेम आहे ना, हिंदूतले काही जण रोज छत्रपतींचा अवमान करत आहे. त्यांनी फक्त आमचा वापर भांडण्यासाठी केलाय आणि त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. अशी जोरदार टीका देखील त्यांनी केली आहे.

माझ्या समाजाचा नुसता वापर केला. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही, महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, असेही जरांगे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस फक्त गोरगरिबाच्या लेकरांचं वाटोळं करू शकतात. त्यांनी काही जण फक्त जाणून-बुजून अवमान करण्यासाठी ठेवले आहेत. आता आम्हाला कळले की, मागील सत्तर वर्ष त्यांनी आमचा वापर फक्त भांडणासाठीच केला आहे. असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!