उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मंत्री नितेश राणे यांना थेट इशारा!! इफ्तार पार्टीतून म्हणाले, जर मुस्लिमांना….

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांना खडे बोल सुनावत मुस्लिम समाजाला ‘सुरक्षेची गॅरंटी’ दिली आहे. पवित्र रमजान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित दावते-ए-इफ्तारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते.
या विशेष कार्यक्रमात सर्व समाज घटकाचे लोक मोठ्या आनंदाने सामील झाले होते. या कार्यक्रमाला अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते.
यावेळी मुस्लिम समाजाला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाच्या पाठीशी असल्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. भारत विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. आपण कोणत्याही फुटीरतावादी शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. आपण नुकतीच होळी साजरी केली आहे, गुढी पाडवा आणि ईद येत आहेत. हे सर्व सण आपल्याला एकत्र राहायला शिकवतात.
आपण सर्वांनी ते एकत्र साजरे केले पाहिजे कारण एकता ही आपली खरी ताकद आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमचा भाऊ अजित पवार तुमच्यासोबत आहेत. जो कोणी आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींकडे डोळे दाखवेन, जर कोणी दोन गटांमध्ये भांडणे निर्माण करण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला, तो कोणीही असो-त्याला सोडले जाणार नाही, त्याला माफ केले जाणार नाही..
दोन धर्मांमध्ये, दोन गटांमध्ये भांडण लावून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करेन, त्याला सोडणार नाही. इथल्या शांततेला बाधा आणण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, त्याच्यावर कायद्याचा बडगा नक्की उगारेन, त्याला माफ करणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
मंत्री शपथ घेतल्यानंतर आपण केवळ एका समाजाचे मंत्री नसतो तर राज्याच्या १३ कोटी लोकांचे मंत्री असतो. त्यामुळे मंत्री म्हणून बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांना आधीच खूप काम असते. त्यामुळे आपल्या बोलण्याने वाद होईल आणि पोलिसांना काम लागेल, असे वर्तन कुणी करू नये, अशा शब्दात अजित पवार यांनी नितेश राणे यांना झापले होते.