Daund News : मनोज जरांगे यांची तोफ पुन्हा धडाडणार! पुन्हा करणार महाराष्ट्र दौरा, दौंडमध्ये ‘या’ तारखेला होणार जंगी सभा..


Daund News : मराठा आरक्षणाच्याबाबत मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

तर दुसऱ्या बाजूला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून ओबीसी नेत्यांनी याचा विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटलांनी आपला पुन्हा महाराष्ट्र दौरा घोषित केला आहे. Daund News

या दौऱ्याच्या निमित्ताने जरांगे पाटील दौंड तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या भेटीसाठी व संवाद साधण्यासाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांकडून देण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांच्या सभेचे स्थळ दोन दिवसात बैठक घेऊन तालुक्यातील समाजाला कळविण्यात येईल असेही यावेळी समन्वयांकडून सांगण्यात आले आहे

दरम्यान, मनोज जरांगे पाटील येत्या १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरूवात करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार असून एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे.

या दौऱ्यात जरांगे पाटील हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. यातच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे.

असा असेल दौरा..

१५ नोव्हेंबर वाशी, परांडा करमाळा,१६ नोव्हेंबर दौंड, मायनी, १७ नोव्हेंबर सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड, १८ नोव्हेंबर सातारा, वाई, रायगड, १९ नोव्हेंबर रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी, २० नोव्हेंबर तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा, २१ नोव्हेंबर ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, २२ नोव्हेंबर विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, २३ नोव्हेंबर नेवासा, शेवगाव, बोधगाव.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!