Crime News : चारित्र्यावर संशय अन् चौघांचा शेवट, पत्नी-मेहुण्यासह सासुरवाडीतील चौघांना जावयाने संपवले, घटनेने उडाली खळबळ..


Crime News : दिवसागणिक राज्यात गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातून एक उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री एक भीषण हत्याकांड उघडकीस आलं आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, दोन मेहुणे आणि सासऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकणी पोलिसांनी आरोपी जावई अटक केली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सासू रुखमा घोसले गंभीर जखमी आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचं नाव आहे.

पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं यवतमाळ जिल्ह्याात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे पती – पत्नी राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती आहे. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंद याला होता. त्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला नेहमी मारहाण करत होता.

त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. याच कारणावरून गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते. या वादातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. Crime News

तसेच, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती रात्री ११ च्या सुमारास पत्नीच्या माहेरी पोहचला. जावई पत्नीच्या घरी गेला आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला.

या घटनेत पत्नी, मेहुणा, सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात सासू रुखमा घोसले मध्यस्थी करत असताना गंभीर जखमी झाल्या आहेत. सासूला रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंकर कळंब पोलिसांनी आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!