Crime News : धक्कादायक! सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी, लग्नाच्या किरकोळ वादातून केला भावाचा खून, वडगाव मावळ यथील घटना..

Crime News : दिवसागणिक पुगुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात घडत असतात.

वडगावमावळमध्ये सख्खा भाऊच पक्का वैरी ठरला आहे. घरगुती वादाच्या कारणांवरुन थेट भावाचा भावाने जीव घेतला. तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस, या शिल्लक कारणावरून सख्ख्या भावाने सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केला.
छातीवर चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करून मोठ्या भावाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत घडली. या प्रकारामुळे वडगाव मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

उदेश पारधी उर्फ उदेश नाबाब राजपूत (वय. ४५, मूळ रा. मुरवाडा स्टेशन, जि. कटनी, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. तर त्याचा सख्खा भाऊ नटू शबस्ता नाबाब राजपूत (वय. ४०) असे आरोपी भावाचे नाव आहे. Crime News

सविस्तर माहिती अशी की, मयत उदेश पारधी राजपूत व आरोपी नटू राजपूत हे सख्खे भाऊ आहेत. ते काही दिवसांपासून वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत राहत होते. उदेश यांच्या मुलीची मुलगी आरोपी त्याच्या मुलासाठी मागत होता.
यातून शुक्रवारी त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने नटू याने मोठ्या भावाला चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करत ठार मारले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत. भावाने भावाचा खून केल्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.