मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये श्रेयवाद ; ठाण्यात झळकले मुख्यमंत्र्यांचे ‘देवा भाऊ’ म्हणून बॅनर;


पुणे: मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारकडून हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला. शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे. अशातच सरकारने या मागण्या मान्य केल्याने ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवा भाऊ म्हणून बॅनर झळकले आहे. आता महायुतीमध्ये मराठा आरक्षणाच्या श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले होते. अशातच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना शपथ घेतली होती. त्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले आहे. यावरून आता युती सरकारमध्येच श्रेय वादाची लढाई सुरू झाली की काय? असा प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे.

दरम्यान कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असा बॅनरवर मजकूर लिहण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार. ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा, देवाभाऊ….’ असंही त्यावर लिहलं आहे. यामुळे आता महायुतीत चांगलंच राजकारण रंगणार असल्याच दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!