महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोनाचा धोका वाढला!! रुग्णसंख्या 1010 वर, 10 जणांचा मृत्यू…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरूवात केली आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सध्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज देशात 1010 कोरोना रुग्णांची नोंद आहे. सर्वाधिक 430 रुग्ण हे केरळमध्ये सापडले. यामुळे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रामध्ये 210 आणि दिल्लीमध्ये 104 रुग्णसंख्या आहे. देशभरात एकूण 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरिएंटचा शोध लागला असून त्यापैकी JN.1 या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. जर तुमची लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो. यामध्ये डोकेदुखी, ताप येणे, डोळ्यात जळजळ, कोरडा खोकला, चव जाणे आणि वास न येणे, घशामध्ये खवखव, सर्दी, थकवा येणे, मांसपेशींमध्ये वेदना, उलट्या होणे, ही लक्षणे आहेत.

ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे बरी झाल्यानंतरही कायम राहतात. दरम्यान, JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. जर लक्षणे दिसून आली तर तत्काळ दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!