राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा, साखर आयुक्तांचा निर्णय, बड्या नेत्यांना धक्का…


पुणे : साखर आयुक्तालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस बजावली. संबंधित कारखान्यांकडून २४६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी रक्कम न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

साखर आयुक्तालयाने आरआरसी नोटीस बजावल्यानंतर, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर संबंधित कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर जिल्हाधिकारी जप्तीची कारवाई करणार आहेत. यामुळे कारखान्यांना रक्कम द्यावी लागणार आहे. हे सगळे कारखाने मोठ्या नेत्यांच्या संबंधित आहेत.

साखर आयुक्तालयाने बजावलेल्या नोटीशीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १०, अहमदनगर जिल्ह्यातील २, सातारा जिल्ह्यातील २ आणि छत्रपती संभाजीनगरमधील १ अशा एकूण १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महसूल वसूलीचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. एफआरपी थकवणे हे कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे.

या कारखान्यांमध्ये खालील कारखान्याचा समावेश आहे.
१. अहमदनगर जिल्हा
स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंड. लि., नेवासा
श्री गजानन महाराज शुगर, संगमनेर
२. सातारा जिल्हा
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना

३. छत्रपती संभाजीनगर
सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., पैठण

४. सोलापूर जिल्हा
मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट
गोकुळ शुगर्स लि., धोत्री
लोकमंगल अ‍ॅग्रो इंड. लि., बिबी दारफळ
लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जनरेशन
भिमाशंकर शुगर मिल्स लि., पारगाव
जयहिंद शुगर्स प्रा. लि., आचेगाव
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा
सिद्धनाथ शुगर मिल्स लि., उत्तर सोलापूर
इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रा. लि.
धाराशिव शुगर लि., सांगोला

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!