Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीमागे अजित पवार आहेत कारण? आतली माहिती आली समोर…


Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.

छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली असावी याबाबत अनेक तर्क समोर येत आहे. मात्र ही भेट कशासाठी होती याबाबतची अधिकृत माहिती छगन भुजबळ आणि शरद पवार हेच देऊ शकतात.

मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. वंचित किंवा इतर घटकांना ते सोबत घेतील अशी चर्चा सुरु आहे. यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाल्याचे कळते. या अस्वस्थेतून भुजबळ शरद पवारांच्या भेटीला आल्याची माहिती मिळत आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून तिकीट मिळावं अशी छगन भुजबळांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. छगन भुजबळ यांच्या आग्रहामुळेच हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित करण्यासही उशीर झाला होता. त्यानंतर राज्यसभेचे तिकीट देखील छगन भुजबळ यांना नाकारण्यात आले होते.

यामुळेच छगन भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुनही छगन भुजबळ महायुती नाराज असल्याची चर्चा आहे. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत चर्चेसाठी गेले असावेत, अशी चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!