आता पुण्यात ‘त्या’ १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय, समाजकंटकांवर बसणार आळा….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे यावर आळा बसने आवश्यक आहे. पुणे शहरात एकूण 17 टेकड्या आहे. या सर्व टेकड्या वन विभागाच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरकृत्य होतात. यामध्ये छेडछाड, बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत.
आता त्या टेकड्यांचे क्षेत्रफळ किती आहे? टेकड्यांवर किती झाडे आहे? या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. म्हातोबा टेकडीवर आगीच्या तीन घटना घडल्या. अडीच हजार झाडांचे नुकसान झाले. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना टेकड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे, रक्षकांची नियुक्ती करण्याचे, जमिनीवर टॉवर बसवण्याचे, गवत साचण्यापासून रोखण्याचे, यंत्रांच्या मदतीने गवत काढून टाकण्याचे आदेश दिले. यामुळे येणाऱ्या काळात बदल दिसणार का? हे लकरच समजेल.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, पुण्यातील एका टेकड्यांमुळे सर्व टेकड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यावर आणि त्यांना वाहने पुरवण्यावर देखरेख ठेवावी लागेल. यामुळे अशा प्रकारच्या घटना कमी होतील.
सर्व टेकड्यांवर या समस्येवर लक्ष देणे आवश्यक आहे.आता जो कोणी डोंगरात काहीही चुकीचे करेल त्याला सोडले जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. यामुळे आता याठिकाणी कोणी जात असेल तर सावधानता बाळगावी लागणार आहे.