खळबळजनक! मध्यरात्री आश्रमात रक्तरंजित खेळ, महिला कीर्तनकाराला दगडाने ठेचलं, संभाजीनगरला हादरवणारी घटना…


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात चिंचडगाव शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इथं एका महिला कीर्तनकारची अज्ञाताने निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोराने मध्यरात्री आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या केली आहे.

हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (वय ५०) असं हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचं नाव आहे. त्या वैजापूर इथं एका आश्रमात राहत होत्या. २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने आश्रमात घुसून त्यांची हत्या केली.

आरोपीनं अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले. हे वार इतके गंभीर होते की, या हल्ल्यात संगिताताई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संगीताताईंनी काही महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती आणि त्यानंतर त्यांनी आश्रमातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांशी चर्चा केली आणि आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!