भाजप नेत्याची भरदिवसा हत्या!! राजकारणात खळबळ, बाईकवरून आले अन् पोटात दिलं विषारी इंजेक्शन…

सध्या राज्यासह देशात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता उत्तर प्रदेशात तर एका राजकीय नेत्याच्या हत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या राहत्या घरी या भाजपच्या नेत्याची हत्या झाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते गुलफाम सिंग यादव यांची भर दिवसा इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली आहे.
घरात असताना तीन तरुण त्यांच्याकडे आले. त्यांच्याशी बोलू लागले. अचानक त्या तरुणांनी गुलफाम यांना विषारी इंजेक्शन दिले आणि ते पळून गेले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले. घटनेची माहिती कळताच पोलिस तात्काळ घटनास्थळ पोहचले.
याबाबत संशंयित आरोपींना ताब्यात घेतले गेले. आरोपीचे हेल्मेट आणि नीडल सापडले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे. या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.
गुलफाम सिंग यांच्यासारख्या नेत्याची भरदिवसा हत्या केली जात असेल तर सामान्य माणसाच्या सुरक्षेचे काय असा सवाल सामान्य जनता विचारत आहे. या घटनेनंतर गुलफाम यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र काही पावले चालताच ते जमिनीवर बेशुद्ध पडले.
दरम्यान, या हत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. गुलफाम सिंग यांचे समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून याबाबत काही राजकीय कनेक्शन आहे का? असा देखील तपास सुरू केला जात आहे. याबाबत आरोपीला अटक करण्यात आली आहे.