बिर्याणी खाणारांनो तुमच्या आवडीच्या बिर्याणीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? वाचून आश्चर्य वाटेल, जाणून घ्या…


नवी दिल्ली : भारतात बिर्याणी फक्त एक पदार्थ नसून, ती एक भावना बनली आहे. लोक तिला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारांमध्ये आवडीने खातात. लखनवी बिर्याणी, हैदराबादी दम बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मुरादाबादी बिर्याणी यांसारखे विविध प्रकार संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत.

बिर्याणीचा प्रत्येक प्रकार वेगळा आणि खास आहे, त्यामुळेच ती सर्वांसाठी खास डिश बनली आहे. ‘बिर्याणी’ हा शब्द फारसी भाषेतून आला आहे. काही इतिहासकारांच्या मते, हा शब्द ‘बिरंजन’ किंवा ‘बिरयान’ या शब्दांमधून आला आहे, ज्याचा अर्थ “भाजलेला किंवा शिजवलेला तांदूळ” असा होतो.

असे मानले जाते की बिर्याणी भारतात मुघलांच्या येण्यापूर्वीच आली होती, पण मुघल काळात तिला विशेष ओळख व शाही दर्जा मिळाला. काही इतिहासकारांचे मत आहे की बिर्याणी भारतात येण्यापूर्वी फारसी (आताचा इराण) येथे प्रचलित होती आणि मुघल आक्रमक तैमूर लंग भारतात आल्यावर ती त्याने येथे आणली.

असे सांगितले जाते की तैमूरच्या सैन्यासाठी पौष्टिक आणि झटपट बनणाऱ्या जेवणाची गरज होती, म्हणून मांस, तांदूळ आणि मसाले एकत्र करून दम (वाफेवर) शिजवले जात होते. त्यानंतर हळुहळु ती भारतात विविध प्रकारांमध्ये विकसित झाली.

बिर्याणीशी जोडलेल्या अनेक कहाण्या आहेत. त्यातील एक प्रसिद्ध कथा म्हणजे मुघल बादशाह शाहजहानची पत्नी मुमताज महल हिने बिर्याणी तयार केली. असे सांगितले जाते की एकदा मुमताज महल सैन्य छावणीत गेली असता तिला सैनिक अशक्त वाटले. ते पाहून तिने स्वयंपाक बनवणाऱ्यांना पौष्टिक आहार तयार करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे तिने मांस व तांदळाचा मिश्रण तयार करण्यास सांगितले. असे केल्याने सैनिकांना जास्त ऊर्जा मिळेल. मग विविध मसाले घालून मांस आणि तांदूळ शिजवले गेले आणि बिर्याणी तयार झाली.

एक वेगळी कथा अशी आहे की एकेकाळी अवधचा शेवटचा नवाब वाजिद अली शाह होता. त्याला जेव्हा इंग्रजांनी पदावरुन काढले आणि कोलकात्यात हद्दपार केले, तेव्हा त्याने लखनवी बिर्याणीची रेसिपीही कोलकात्यात आणली.

पण त्या काळात पैश्यांची कमतरता असल्यामुळे त्याने मटणाऐवजी बटाट्याचा वापर केला. त्यामुळेच कोलकाता बिर्याणीत उकडलेले बटाटे टाकले जातात. ही पद्धत कोलकाता बिर्याणीला इतर बिर्याण्यांपेक्षा वेगळे बनवते. आजही कोलकात्यात ही खास बटाट्याची बिर्याणी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. याशिवायती भारतभर लोकप्रिय आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!