पुणे हादरले! जन्मदाता बापच निघाला नराधम, १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अन्…

पुणे : अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरीक अश्लिल चाळे करुन बापानेच तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तसेच आपल्याच पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येरवड्यातील सुभाषनगरमध्ये शनिवारी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४० वर्षाच्या बापावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना १६ वर्षाची मुलगी आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादी यांचा पती आपल्या मुलीला जवळ बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे करायचा.
तिच्या अवघड जागेवरुन हात फिरत असे. ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांच्यात शनिवारी (ता.१२) रात्री ११ वाजता वाद झाला. तेव्हा त्याने फिर्यादींना मारहाण करुन धमकावले. त्यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवले.
दरम्यान, पत्नीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून त्यानुसार पतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गाताड तपास करीत आहेत.