मोठी बातमी! आमदाराची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या, रात्री 12 वाजता बायको मुलांसमोर बंदूक घेतली अन्…


नवी दिल्ली : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत घरात बायको मुलं असताना अचानक आमदारानं टोकाचं पाऊल उचललं आहे. या आमदारानं बायको मुलं घरात असताना जे केलं त्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आमदाराने घरात बायको, मुलं असताना गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण अजून समोर आलं नाही. आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने सगळेच हादरले असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.

आमदाराने आपल्या लायसन्स रिवॉल्वरने गोळी मारुन आपले आयुष्य संपवले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. हलका पश्चिम आप आमदार गुरप्रीत गोगी असे त्यांचे नाव आहे. रात्री 12 वाजता त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

आपचे आमदार गुरप्रीत गोगी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. खोलीत जेवत असताना अचानक त्याच्या खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळीचा आवज ऐकून त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी खोलीकडे गेल्या.

खोलीत गोगी रक्ताच्या धारोळ्यात होते, ते पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. आमदार गोगींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे सगळेच हादरले असून याबाबत तपास केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र ही घटना कौटुंबिक वादातून झाली की इतर काही गोष्टींमुळे झाली याबाबत अजून काही माहिती समोर आली नाही. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. या घटनेवर अनेकांनी दुःख व्यक्त केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!