मोठी बातमी! पुण्यात ट्रॅव्हल्सला भीषण आग, उरला फक्त सांगाडा, 4 जणांचा भयंकर मृत्यू…

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या आगीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्स अक्षरश: जळून खाक झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही.
आतमध्ये असलेल्या चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत बसची आग आटोक्यात आली आली आहे.
दरम्यान, टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. चार जण होरपळून गेले आहेत. टेम्पो ट्रॅव्हल्सचा दरवाजा लॉक झाल्याने उघडला नाही. त्यामुळे होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत तपास केला जात आहे.
ही आग इतकी भीषण होती की, सीटचा केवळ सांगाडा उरला होता. तर दोन जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत तपास सुरु आहे.