मोठी बातमी! राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय…


मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आज जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारचे उपसचिव नितीन खेडकर यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत नियुक्ती रद्द करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. तात्काळ या सर्व नियुक्त्या रद्द कराव्यात असे आदेश नियोजन विभागाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे.

त्यांच्या शिफारसीनुसार येणाऱ्या विशेष निमंत्रित सदस्यांना या बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. यामुळे आमदार खासदारांच्या जवळच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. आता नवीन नियुक्त्या होईपर्यंत सदस्यांना बैठकींना बसता येणार नाही.

सरकार बदलल्यानंतर सर्व जिल्ह्यात नविन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. आता नियुक्त्या झाल्या असल्या तरी अनेकांची नाराजी पुढे आली आहे. यामुळे डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा नियोजनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाते.

त्यामुळे आता नवीन सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश येईपर्यंत इच्छुकांना वाट पहावी लागणार आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या याचा समावेश आहे.

तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती नियम, २०१८ च्या अधिसुचनेतील परिच्छेद ७ मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर नामनिर्देशीत सदस्यतसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या या शासन निर्णयान्वये त्वरीत प्रभावाने रद्द करण्यात येत आहे, असे म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!